IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals ??
— Stay home stay safe! Take your vaccine?? (@ashwinravi99) April 25, 2021
अश्विनने ट्विट करत म्हटले कि, ‘मी उद्यापासून आयपीएलच्या या मोसमात ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत आहे आणि मला या कठीण काळात त्यांच्या बरोबर राहायचे आहे. जर गोष्टी सुधारल्या तर मी परत येईन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स. ‘ दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला, ज्यात सुपर ओव्हर झाली आणि दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला.




