iraq hospital fire

भयानक! रुग्णालयात ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, ८२ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी..

ग्लोबल

बगदाद : इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर 100 पेक्षा जास्त रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरही उपचार सुरु होता. या घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बगदाद येथील अल खतीब हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरु होता. तिथूनच ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लागली तेव्हा रुग्णालयात मोठा गदारोळ सुरु झाला. रुग्ण, डॉक्टर जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. या गदारोळा संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोक तर जीव वाचवण्यासाठी थेट रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत होते.

रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग मोठी होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच आत अडकलेल्या रुग्नांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. अग्निशमन दल, प्रशासन, स्वयंसेवक यांनी रुग्णांना बाहेर काढण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी या घटनेप्रती संवेदना व्यक्त केल्या. ही घटना अतिशय दुर्देवी असून या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी जो दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान कदीमी यांनी या घटनेनंतर तातडीची बैठकही बोलावून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या घटनेची चौकशी करुन 24 तासात त्याचा रिपोर्ट सादर करावा, असा आदेश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत