US President Joe Biden falls off his bicycle
ग्लोबल

Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तोल जाऊन सायकलवरून पडले

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सायकलवरून पडले. ते शनिवारी सकाळी डेलावेर राज्यातील त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील घराजवळ सायकल चालवत असताना खाली पडले, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. व्हाईट हाऊसच्या पूल अहवालातील व्हिडिओमध्ये 79 वर्षीय अध्यक्ष पडल्यानंतर लगेच उठताना दिसले. त्यानंतर ते लगेच म्हणाले कि, “मी व्यवस्थित आहे.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जो बायडेन फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासोबत रेहोबोथ बीच, डेलावेर येथील त्यांच्या बीच होमजवळील स्टेट पार्कमध्ये सायकल चालवत होते. यावेळी ते तेथे उपस्थित असलेल्या लोकांबरोबर बोलण्यासाठी थांबत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांनी उपस्थित हितचिंतक आणि पत्रकारांच्या छोट्या जमावाला सांगितले की बाइक क्लिपमधून पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला. व्हाईट हाऊसच्या पूल अहवालात म्हटले आहे की त्यांना कोणतीही जखम झाली नसून खरचटलेले देखील नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत