आज आयपीएलचा शेवटचा डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुपारी ३.30 वाजता अबू धाबी येथे सामना रंगेल. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल.
पंजाबचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नई आधीच प्ले-ऑफ रेसमधून बाहेर पडली आहे. चेन्नईने हा सामना जिंकल्यास पंजाबसाठी प्ले-ऑफचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील. कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. अशा परिस्थितीत, जो संघ हा सामना गमावेल तो स्पर्धेमधून बाहेर जाईल.
मागच्या सामन्यात चेन्नईने पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. मोसमातील 12 व्या सामन्यात कोलकाताने राजस्थानला 37 धावांनी पराभूत केले.
राजस्थान रॉयल्सचा सक्सेस रेट 50.94% आणि कोलकाताचा सक्सेस रेट 51.83% इतका आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत लीगमध्ये 160 सामने खेळले असून 81 सामने जिंकले आणि 77 गमावले. 2 सामने अनिश्चित होते. त्याचबरोबर कोलकाताने आतापर्यंत 192 पैकी 98 सामने जिंकले आणि 93 गमावले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा सक्सेस रेट सर्वाधिक 59.60% आहे. पंजाबचा सक्सेस रेट 46.03% आहे. चेन्नईने आतापर्यंत लीगमध्ये एकूण 178 सामने खेळले आहेत. त्यापैकी 105 जिंकले आणि 72 सामने गमावले आहेत. 1 सामना अनिर्णीत होता. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 189 सामने खेळले आहेत. त्यापैकी 88 जिंकले आहेत आणि 101 गमावले आहेत.
अबू धाबी आणि दुबईमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल. त्याचबरोबर दुबईमध्ये नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.