युरोप, अमेरिकेत थंडीमुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत.
बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाउन संपवायचा किंवा वाढवायचा हे पाहिलं जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटलेय.
In this country, as across much of Europe, the virus is spreading even faster than the reasonable worst case scenario of our scientific advisers.
If we fail to take action, then there is a real risk of depriving non-Covid patients of the care that they need from the NHS (1/10)
— Boris Johnson (@BorisJohnson) October 31, 2020
यूरोपमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात येत आहे. गुरुवारी फ्रान्समध्ये लॉकडाउन घेण्यात आला आहे. पॅरिसमध्ये आणि आसपास असणाऱ्या परिसरातील वाहतूक कोंडी किमीमध्ये मोजल्यास जवळपास ७०० किमी लांब वाहतूक कोंडी झाली होती. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा लॉकडाउन एक महिन्यांसाठी लागू असणार आहे. यामुळेच गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्रभावी होण्याआधी सामान खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. यामुळेच ही स्थिती निर्माण झाली होती.