gas distribution service
देश

जाणून घ्या गॅस वितरण सेवेची प्रक्रिया, बँकेच्या वेळात देखील होणार बदल आणि व्याजदरात कपात…

पुणे : सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल झाले आहे. घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार..

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अशी असेल गॅस वितरण सेवेची प्रक्रिया :

  1. सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार.
  2. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल.
  3. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार.
  4. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे.

आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ०. २५ टक्क्यांच्या कपातीनंतर आता व्याजदर 3.25 टक्के असणार आहे.

बँक ऑफ बडोदा आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी देखील शुल्क आकारणार आहे. ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. लोन खात्यासाठी तीनपेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास 150 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर बचत खात्यामध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळाच पैसे जमा करता येणार आहे. चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत