आयपीएलमध्ये आज एका दिवसात दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये अबूधाबी येथे दुपारी साडेतीन वाजता होईल. यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुबई येथे सायंकाळी साडेसात वाजता सामना होईल.
कोलकाता प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळण्याच्या आशा कायम राखण्यासाठी इन-फॉर्म दिल्लीशी सामना करेल. दिल्लीला हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले स्थान सुरक्षित करायचे आहे. यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असतील. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. पराभूत संघाला प्ले ऑफसाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली 14 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. त्याचबरोबर 10 गुणांसह कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद 4 विजयांसह 5 व्या स्थानावर आहे. तसेच, पंजाबने हंगामात 4 सामने जिंकले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे ते 6 व्या स्थानावर आहे.
अबू धाबी येथे पीचमुळे फिरकीपटूंना खूप फायदा होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.




