Balasaheb Thorat

महाविकास आघाडी मध्ये बिघाडी? मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

देश महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीत आहे पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही थोरातांनी व्यक्त केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हटले कि, राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असं थोरात म्हणाले.

पुढे बोलताने ते म्हटले कि, शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा – शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत