Shiv Sena chief Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा – शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर..

देश महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, काल खासदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये आपल्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाब असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, असा कोणताही दबाब आपल्यावर नसल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. देशाच्या विचार कपरून द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देत आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचं राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. तसेच अनेक शिवसैनिकांनी मला विनंती केली. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना कधीच कोत्या मनानं वागलेली नाही. तसेच आता राज्यात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. त्याप्रमाणे मी मुर्मू यांना विरोध करायला हवा होता. कारण त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र, मी इतक्या छोट्या मनाचा नाही. आदिवासी महिला म्हणून मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत