New guidelines for social media and OTT platforms

हद्दच झाली! ट्वीटरने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्याचेच अकाउंट केले ब्लॉक, आणि मग…

देश

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट ट्वीटरने आज ब्लॉक केले होते. जवळपास एक तास त्यांचे अकाउंट ब्लॉक होते. ट्वीटरने याबाबत सांगितले की प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेची क्लिक पोस्ट केल्याने ट्वीटरकडे तक्रार आली. यानंतर अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले. याबाबत रविशंकर प्रसाद यांनी संताप व्यक्त केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “मित्रांनो आज एक विचित्र घटना घडली. ट्वीटरने जवळपास एक तास माझं अकाउंट बंद केलं होतं. मला अकाउंटचा उपयोग करता येत नव्हता. अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ऍक्टचं उल्लंघन केल्याचं कारण ट्वीटरने दिले. पण नंतर ट्वीटरने माझं अकाउंट पुन्हा सुरू केलं. ट्वीटरने कोणतीही पूर्वकल्पना न देता माझे अकाउंट ब्लॉक केले, हे एकप्रकारे नवीन नियमांचे उल्लंघन आहे.”

प्रसाद पुढे म्हणाले कि, “खास करून वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतींच्या क्लिप्स आणि त्यांच्या प्रभावामुळे ट्वीटरचे पंख कुरतडे गेले आहेत. ट्वीटरला आयटी नियमांचे पालन का करायचे नाही? हे आता यावरून स्पष्ट झाले आहे. नियमांचं पालन केल्यास कंपनीला कोणाच्याही अकाउंटमध्ये मनमानी पद्धतीने दखल देता येणार नाही आणि अजेंड्यानुसार काम करणं ट्वीटरला अवघड होईल. हे यामागचं कारण आहे.”

केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नियमावली जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि ट्वीटरमध्ये वाद सुरू आहे. हा वाद सुरू असताना आता ट्वीटरने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचेच अकाउंट काही काळासाठी बंद केल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत