The defeat of Bihar may seem normal to the Congress leadership, Kapil Sibal said

मोठी बातमी! अखेर कपिल सिब्बल यांनी सोडली काँग्रेसची साथ, समाजवादी पक्षाची मदत घेऊन राज्यसभेवर जाणार

देश राजकारण

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसची साथ सोडली आहे. कपिल सिब्बल यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तसंच, समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कपिल सिब्बल यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काहीवेळापूर्वीच त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. कपिल सिब्बल हे आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची मदत घेऊन राज्यसभेवर जाणार आहेत. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील G-23 या गटाचा भाग होते. गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर नाराज होते. त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याऐवजी सामूहिक नेतृत्त्व असावे, हे मत त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते.

कपिल सिब्बल यांनी आज लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. यानंतर सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपण १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत