Governor Koshyari congratulates Everest conqueror Savita Kanswal

राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन

देश

मुंबई : मूळच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरु गावच्या गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट तसेच पाचवे मोठे शिखर माउंट मकालू यशस्वी सर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना कौतुकाची थाप दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंचवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी 12 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट तर 28 मे रोजी मकालू शिखर सर केले. अशा प्रकारे अवघ्या सोळा दिवसांच्या फरकाने दोन मोठी गिरीशिखरे सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. सविता कंसवाल यांनी सोमवारी राज्यपालांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आपल्या विक्रमाची माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत