चेन्नई मधील अमोनियम नायट्रेटचा साठा अशा प्रकारे लावला मार्गी…

देश

मागच्या आठवड्यात बैरुत शहरात अमोनियम नायट्रेटच्या झालेल्या महाभयंकर स्फोटांपासून बोध घेत, चेन्नईतील अमोनियम नायट्रेटचा साठा मार्गी लावण्यात आला आहे. बैरुतमधील घटनेनंतर भारताच्या चेन्नई शहरातही एका गोदामामध्ये असाच काहीशे टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही चिंतेची बाब होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चेन्नईतील स्फोटक केमिकलचा ई-लिलाव झाला असून हा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. चेन्नईत हा अमोनियम नायट्रेटचा साठा जिथे होता, त्याच्या आसपास जवळपास १२ हजारची लोकवस्ती आहे.
चेन्नईजवळ कंटेनरमध्ये ६९७ टन केमिकल ठेवण्यात आले होते. केमिकलने भरलेले काही कंटेनर आधीच हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन उर्वरित केमिकलही कार्गोने पाठवण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत