Doctor runs 3 kms to perform crucial surgery, patient recovers

रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर 3 किमी धावत गेले, रुग्णासाठी होता जीवन-मरणाचा प्रश्न

देश

बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये रहदारी ही एक प्रमुख चिंता आहे, ज्यामुळे प्रत्येकाच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होत आहे. याचा अनुभव मणिपाल हॉस्पिटल सर्जापूर येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जन डॉ. गोविंद नंदकुमार यांनी घेतला. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता एका मध्यमवयीन महिलेवर पित्ताशयाची इमर्जन्सी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करायची होती. रुग्णासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. पण सर्जापूर – मराठहळ्ळी भागात डॉ. गोविंद ट्रॅफिकमध्ये अडकले. त्यानंतर डॉक्टरांनी आपली कार ड्रायव्हरसोबत सोडली आणि 3 किमी अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये धावत जाऊन महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि रुग्णाला वेळेवर घरी सोडण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. गोविंद नंदकुमार याबद्दल म्हणाले कि, “मी दररोज मध्य बंगळुरू ते बंगळुरूच्या आग्नेय भागात सर्जापूर येथे असलेले मणिपाल हॉस्पिटल असा प्रवास करतो. शस्त्रक्रियेसाठी मी घरून वेळेत निघालो होतो. माझी टीम तयार होती आणि सर्व तयारी झालेली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच शस्त्रक्रिया करायची होती. मात्र, रस्त्यामध्ये प्रचंड ट्राफिक होते. ती रहदारी बघून मी गाडी ड्रायव्हरसोबत सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विचार न करता हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटलो.

डॉ. गोविंद मंगळवार 30 ऑगस्ट रोजी दीर्घकाळापासून पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मध्यमवयीन महिलेवर लॅप्रोस्कोपिक पित्ताशय शस्त्रक्रिया करण्यास तयार होते. शस्त्रक्रियेला उशीर झाल्यामुळे रुग्णाच्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या. रुग्णाला भूल देण्याच्या तयारीत असलेली डॉ. गोविंद यांची टीम डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच कामाला लागली. कोणताही विलंब न करता डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जिकल पोशाखात उतरले आणि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रुग्णाला नियोजित वेळेत डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या तिची प्रकृती ठीक आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत