Brahmos missile misfire: Service of 3 IAF officers terminated

ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात डागल्याबद्दल 3 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारकडून कारवाई

देश

नवी दिल्ली : ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडलं होतं, तपासानंतर त्या घटनेला तीन अधिकाऱ्यांना प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली. त्यांची सेवा केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांना मंगळवारी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडरचा समावेश आहे. ते म्हणाले की, तपासात असे दिसून आले आहे की अधिकाऱ्यांनी मानक कार्यपद्धतीत चूक केली होती, त्यामुळे चुकून क्षेपणास्त्र डागले गेले होते. ही घटना 9 मार्च 2022 रोजी घडली होती.

काय आहे प्रकरण?
9 मार्च 2022 रोजी तांत्रिक त्रुटींमुळे भारताने चुकून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागले होते, ज्याबद्दल पाकिस्तान सरकारने भारत सरकारला स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. तेव्हा भारत सरकारने प्रत्युत्तर दिले की क्षेपणास्त्र चुकून डागले होते, जे पाकिस्तानमध्ये पडले आणि नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ही खेदजनक घटना घडली. त्याच वेळी, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली आहे आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने म्हटले होते की भारताकडून गोळीबार करण्यात आलेले एक हाय-स्पीड प्रोजेक्टाइल आपल्या हवाई हद्दीत घुसले आणि पंजाब प्रांतातील खानेवाल जिल्ह्यातील मियां चन्नूजवळ पडले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत