bank of baroda customer injured mask argument security personnel firing
क्राईम देश

धक्कादायक! मास्क न लावता बँकेत गेला ग्राहक, बँकेच्या सुरक्षा रक्षकाने घातली गोळी

उत्तर प्रदेश : बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीला मास्क न लावता बँकेत जाणे खूप महागात पडले. या व्यक्तीचा मास्कवरून बँकेच्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुरक्षा कर्मचार्‍याने त्या व्यक्तीच्या पायाला गोळी मारली. या घटनेमुळे बँकेत खळबळ उडाली. पीडित व्यक्ती रेल्वे कर्मचारी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेला रेल्वे कर्मचारी राजेश हा मास्क न लावता काही कामासाठी बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत आला होता. बँक सुरक्षारक्षक केशव प्रसाद यांनी त्यांना मास्कशिवाय पाहिल्यावर आत जाऊ दिले नाही आणि मास्क न लावल्याबद्दल आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी गार्डच्या बंदुकीतून गोळीबार झाला. ही गोळी थेट रेल्वे कर्मचारी राजेशच्या पायाला लागली. गोळीबार होताच बँकेत खळबळ उडाली. यानंतर जखमी राजेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बँकेच्या कर्मचार्‍यांकडून घटनेची माहिती घेतली. या दरम्यान पोलिसांनी सुरक्षा कर्मचारी केशव प्रसाद यांना अटक केली आणि त्यांची परवानाधारक बंदूकही जप्त केली. परंतु, सुरक्षा कर्मचारी केशवने जाणूनबुजून गोळीबार केला नसल्याचे सांगितले आहे.

धक्कादायक! सिझेरियन ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून झाली मोठी चूक, महिलेचा मृत्यू

पीडित राजेश यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मास्क न लावल्याबद्दल बँकेच्या गार्डने राजेशला गोळी मारली. आरोपी हा बँकेचा खासगी सुरक्षारक्षक आहे. त्याच्याकडे परवानाधारक बंदूक आहे. तिच्यातून त्याने गोळीबार केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत