Indian Army Helicopter Crashes In Pathankot Ranjit Sagar Dam
देश

पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात कोसळले लष्कराचे हेलिकॉप्टर

पठाणकोट : पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने वैमानिक आणि सह-वैमानिक सुरक्षित आहेत. एनडीआरएफ आणि पोलिसांकडून शोध व बचावकार्य सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 254 आर्मीच्या एव्हिएशन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने सकाळी 10:20 वाजता मामून कॅंटमधून उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर रणजीत सागर तलावावरून खूपच कमी उंचीवरून उडत होते आणि त्यानंतर ते कोसळले. पठाणकोटला लागून असलेल्या जम्मू -काश्मीर भागातील रणजीत सागर धरणाजवळ सैनिक हेलिकॉप्टरने गस्त घालत होते. धरणातील बोटी आणि गोताखोरांच्या मदतीने हेलिकॉप्टरचा शोध घेतला जात आहे. मात्र, हा भाग जास्त खोल असल्यामुळे हेलिकॉप्टरचा शोध घेणे अवघड झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत