The results of class XII will be announced today at 4 pm

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, असा पहा निकाल…

शैक्षणिक

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बोर्डानं यावर्षी सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई दहावीचा परिणाम अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त डिजिलॉकरवरही उपलब्ध होईल.

सीबीएसई दहावीचा निकाल कसा पाहाल?

  1. अधिकृत वेबसाईट cbseresult.nic.in किंवा cbse.nic.in वर जा.
  2. पुढील पानावर क्लिक करा आणि आपले डिटेल्स टाका.
  3. डिटेल्स सबमिट केल्यानंतर दहावीचा रिझल्ट 2021 चेक करा. रिझल्ट स्क्रिनवर येईल.
  4. रिझल्ट डाऊनलोड करा आणि तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत