education institutes
देश शैक्षणिक

PM YASASVI शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू, अशाप्रकारे करा अर्ज…

Scholarship Scheme : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली आहे. NTA ने PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी शालेय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन केलेली शिष्यवृत्ती योजना आहे, जी इयत्ता 9 वी मध्ये किंवा 11 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तेच विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी होईल?
YASASVI 2022 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी, NTA 11 सप्टेंबर रोजी MCQ स्वरूपात प्रवेश परीक्षा आयोजित करेल. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जुलैपासून सुरू झाली असून २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज भारत येतील. अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचा अर्ज भरू शकतात.

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जा.
  2. यानंतर वेबसाइटवर दिलेल्या रजिस्टरच्या लिंकवर क्लिक करा.
  3. आता तुमचे नाव, ईमेल, जन्मतारीख आणि पासवर्ड सबमिट करून खाते तयार करा.
  4. आता लॉगिन वर क्लिक करा आणि अर्ज क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून लॉगिन करा.
  5. त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
  6. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत