Burglary thieves arrested in Pune, valuables worth 10 lakhs seized
पुणे महाराष्ट्र

पुणे : मौज-मजेसाठी घरफोडी चोरी करणाऱ्यांना अटक, तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुण्यात घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोरेगाव पार्क येथील फिर्यादी 19 जुलै रोजी त्यांचा लिबर्टी सोसायटी बंगलो नंबर 7 हा बंगला लॉक करुन मुंबईला गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या बंगल्याची स्लाईडिंग विंडो उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्यामधील ५५ इंचाचे 2 एलईडी टीव्ही, 2 पॉवर स्पीकर, 2 सराऊंड स्पीकर,1 ऍम्प्लिफायर आणि 1 बुम बॉक्स चोरी केला. तसेच फिर्यादी यांच्या बंगल्याशेजारील सुरोज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिस मधील एक 65 इंची एलईडी टीव्ही असे सर्व सामान घरफोडी चोरी करुन नेले. याप्रकरणी फिर्यादीने गुन्हा दाखल केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, दाखल गुन्हयामध्ये कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अगर साक्षीदार उपलब्ध नव्हते. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बातमीदारामार्फत बातमी मिळवून वेग-वेगळया सर्व शक्यता पडताळल्या, त्यानंतर गणेश तिमन्ना साखरे (वय 21 वर्षे, रा. रेणुका वस्ती, नॉर्थ रोड कोरेगाव पार्क,पुणे) आणि विधीसंघर्षीत बालक यांनी
सदर गुन्हा केल्याची खात्रीपुर्वक कबूली दिल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून गुन्हयात चोरी केलेला ऐवज पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपींनी तपासामध्ये मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा देखील कबुल केला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले. तसेच सदर आरोपींकडून इतर आयफोन कंपनीचे मोबाईल, ऍपल वॉच, डेल कंपनीचा लॅपटॉप, साऊंड बॉक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु असा अंदाजे दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत