Pune woman Suicide due to constant harassment and humiliation

पुण्यात सततच्या छळ आणि अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे महाराष्ट्र

पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. संगीता आणि अनिल यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अनिल व संगीता आंबेगाव बुद्रुक येथील ओव्हिनिअर सोसायटीत राहत होते. लग्नानंतर काही दिवसांनी या महिलेचा पती तिला तू कमी शिकलेली आहेस. तुझी बायको होण्याची लायकी नाही, असे म्हणून मानसिक छळ तसेच अपमान करत होता. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत या महिलेने २० मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत