पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) […]

