पुणे महाराष्ट्र

पुणे हादरलं! आईकडूनच 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती चिंताजनक

पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सोनी संतोष जायभाय असे आहे. रागाच्या भरात किंवा मानसिक तणावातून सोनी हिने आपला मुलगा साईराज संतोष जायभाय (वय 11) याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर आरोपी महिलेने आपली मोठी मुलगी धनश्री (वय 13) हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जायभाय कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून उदरनिर्वाहासाठी काही वर्षांपूर्वी पुण्याच्या वाघोली परिसरात स्थलांतरित झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे.

मात्र, एका आईने आपल्या पोटच्या लेकरांबाबत इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा मानसिक आजार; या सर्व शक्यतांचा विचार करत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत