Chief Minister Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray admitted to hospital
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या घरीच विलगीकरणात होत्या. परंतु, आता त्रास जाणवू लागल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी २० मार्चला यासंबंधी माहिती दिली होती. आदित्य ठाकरेंच्या संपर्कात असल्याने रश्मी ठाकरे यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती. यानंतर त्या विलगीकरणात होत्या. पण आता खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत