Accused arrested

पुणे : म्हाडा पेपर फुटी प्रकरणात आणखी एक आरोपीला अटक

पुणे महाराष्ट्र

पुणे : म्हाडा भरती परीक्षापेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश पुणे सायबर पाेलीसांनी केला. जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डाॅ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक याआधीच पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणात पोलिसांनी विजय बाबुलाल दर्जी या आरोपीला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून विजय बाबुलाल दर्जी हा बारावा आरोपी आहे.
डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. हे एजंट परीक्षार्थीशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगणार होते. त्यानंतर देशमुख फेरफार करून परीक्षार्थींना पास करणार होता. हा त्यांचा बदललेला प्लॅन होता.

महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या विविध 14 संवर्गातील गट (अ) (ब) (क) रिक्त पदांची भरती प्रक्रीया दिनांक 12, 15, 19, 20 डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. यावेळी परिक्षेची प्रश्नपत्रिका गोपनिय ठेवण्याबाबत आदेश असताना देखील प्रितिश देशमुख यांनी गोपनियतेचा भंग करण्याच्या उद्देशाने ती स्व:ताजवळ त्यांच्या लॅपटॉप व पेनड्राईव्हमध्ये बाळगून त्रयस्त व्यक्ती संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्यासह एकत्र येवून गुन्हेगारी स्वरुपाचा कट करण्यास तसेच शासनाची, म्हाडाची व परिक्षार्थीची फसवणूक केली. प्रितिश देशमुख तसेच त्याचे मित्र संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्याविरुदध कायदेशीर तक्रार आहे.

सदर गुन्हयात आतापर्यंत एकुन 12 आरोपींना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा तपास प्रगतीपथावर होता. गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी क्र. 12 विजय बाबुलाल दर्जी (वय ४५, व्यवसाय – वकील, बालाजी जॉब प्लेसमेंट संचालक, सध्या रा. प्लॉट नं.07, नवीन जोशी कॉलनी, जळगाव) याला 26 मे रोजी अटक केली असुन न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत