Accused arrested

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे महाराष्ट्र

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वाघोली बाजार तळाजवळ सापळा रचून आरोपी विठ्ठल भानुदास शिंदे (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून चंदनाची झाडे कापून चोरून नेल्याच्या घटना समोर येत होत्या. याबाबत कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्हयातील आरोपी बाबत माहिती मिळाल्याने सदरचा गुन्हा वर्ग करुन घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास चालू असताना गुन्हयातील आरोपी विठ्ठल शिंदे (रा. शिंदवणे, पुणे) हा वाघोली बाजार तळाजवळ येणार आहे, अशी खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे वरिष्ठांना माहिती देवुन वाघोली बाजार तळाजवळ सापळा रचून आरोपी विठ्ठल शिंदे याला ताब्यात घेतले.

आरोपीने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्हयात अटक करुन त्याची
पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने त्याच्या साथीदारसह पुणे शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून चंदनाची झाडे कापून चोरुन नेल्याचे सांगितले. त्याच्या वाटणीस आलेले चंदनाचे तासलेले वेगवेगळया आकाराचे लाकडी ओंडके असा एकूण 30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये
पुणे शहरातील कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनकडील 2, अलंकार पोलीस स्टेशन 2, कोथरुड पोलीस स्टेशन 2 व शिक्रापुर
पोलीस स्टेशन, पुणे ग्रामिण कडील 1 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्हयातील त्याच्या साथीदाराचा शोध चालू असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-6 करीत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत