बेंगळुरू : आज बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली. टिकैत तेथे पत्रकार परिषद घेणार होते. कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी देखील झाली.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बेंगळुरू येथील गांधी भवन येथे राकेश टिकैत पत्रकार परिषद घेणार होते. यावेळी राकेश टिकैत यांच्यावर एका तरुणाने काळी शाई फेकली. शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युधवीर सिंग यांच्यावर शाई फेकल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. तिथे काही लोक एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत, तर पार्श्वभूमीत मोदी-मोदी असा आवाज ऐकू येत आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान काही लोकांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांच्यावर काळी शाई फेकली. यानंतर त्यांनी तेथे खुर्च्याही फेकण्यास सुरुवात केली. राकेश टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांनी त्यांच्यावर काळी शाई फेकली ते येथील शेतकरी नेते चंद्रशेखर यांचे समर्थक आहेत.
Rakesh Tikait faces black ink during a presser in Bengaluru!
Tikait had reportedly come to give clarification on allegations against a farmer leader. #RakeshTikait pic.twitter.com/WnXnqzagHD
— Gagandeep Singh (@Gagan4344) May 30, 2022




