Thackeray-government's scam Kirit Somaiya

किरीट सोमय्या यांचे ठाकरे कुटुंबियांवर आरोप, ‘या’ अनोंदणीकृत कंपनीच्या चाैकशीची केली मागणी

नाशिक महाराष्ट्र राजकारण

नाशिक : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले कि, ‘श्रीजी’ हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची टिका केली जात आहे. मात्र, आमदारांना घाेडे म्हणण्याचे काम फक्त गाढवच करु शकताे, अशी खरमरीत टिकादेखील किरीट साेमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदारांच्या घाेडेबाजाराबाबत निवडणूक आयाेगाला माहीती देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच याबाबत निवडणूक आयाेगाने मुख्यमंत्री व सामनाच्या संपादकांचा जबाब नोंदवावा व कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

शिवाजी पार्क येथे उभी असलेली श्रीजी हाेम इमारत काेणाची आहे, याबाबतची सर्व कागदपत्रे ईडीकडे दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटकणकर, राहूल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्रीजी हाेम्स बनवल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत