मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वरळीकरांचे आभार मानले ते म्हटले कि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बरोबर एक वर्षापूर्वी वरळीतील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरळीतील तमाम जनतेचे आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्राने आणि वरळीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या एक वर्षात केला आहे आणि यापुढे सुद्धा करत राहणार आहे.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बरोबर एक वर्षापूर्वी वरळीतील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरळीतील तमाम जनतेचे आभार मानतो. pic.twitter.com/e6HoQRADAE
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2020
आपला महाराष्ट्र आणि आपली वरळी “A+” घडविण्याचे स्वप्न मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार आहे. आपले प्रेम व विश्वास असेच पाठीशी राहू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
आपला महाराष्ट्र आणि आपली वरळी “A+” घडविण्याचे स्वप्न मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार आहे. आपले प्रेम व विश्वास असेच पाठीशी राहू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना??
हीच ती वेळ! pic.twitter.com/p03uyx5rYm
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2020




