Drowned Car Of Ghatkopar Has Been pulled out

अखेर अचानक बुडालेली ‘ती’ कार बाहेर काढण्यात यश

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : इमारतीमधील पार्किंगमध्ये उभी केलेली कार काही क्षणात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विहिरीत बुडालेली ही कार अखेर १२ तासांनी बाहेर काढण्यात आली आहे. रविवारी सकाळी घाटकोपर येथील एका इमारतीतील पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन कार बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करुन ती विहीर झाकण्यात आली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर सोसायटीतील कार पार्किंग होती. दरम्यान, सोशल मीडियावर कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, कार खड्ड्यात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेचा संबंध थेट मुंबई महापालिकेच्या नालेसफाईशी जोडला होता. यावर मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन खात्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते आणि या घटनेशी महापालिकेचा कोणताही संबंध नसून ही एका खासगी सोसायटीतील घटना असल्याचे सांगितले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत