Anil Deshmukh arrested by CBI in corruption case

ब्रेकिंग! अनिल देशमुख यांना CBI ने केली अटक

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, CBI कोठडी टाळण्यासाठी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल झाले, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला होता. कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणासंदर्भात देशमुख यांच्या कोठडीची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या अर्जाला विशेष सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली होती, त्या आदेशाला देशमुख यांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती डेरे यांनी ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर ठेवण्याचे निर्देश दिले. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सीबीआय प्रकरणातील अन्य दोन आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्जही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत.

अनिल देशमुख जाणूनबुजून एजन्सीचा ताबा चुकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला सरकारी जेजे रुग्णालयात दाखल केले. सोमवारी, ४ एप्रिल रोजी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने हा दावा केला. ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये दाखल असलेल्या अनिल देशमुख यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

एनसीपी नेते अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर 2021 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यापूर्वी एजन्सीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि सचिव संजीव पालांडे यांना ताब्यात घेतले होते, तर सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना बडतर्फ केले होते. गेल्या आठवड्यात मुंबईतील एका न्यायालयाने एका वेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयला त्यांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली.

१०० कोटी वसुली प्रकरण : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. देशमुख यांनी आरोप नाकारले, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत