मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.