Breast Cancer Awareness Month: These 3 signs are seen in the body

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, ‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

Breast Cancer Awareness Month : ऑक्टोबर महिना हा जगभरात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल सर्वांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होतो, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याची प्रकरणे भारतातही दरवर्षी वाढत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सामान्यपणे स्तनाचा कर्करोग म्हटलं की तो फक्त स्त्रियांशी संबंधित असल्याचा विचार येतो, परंतु सत्य हे आहे की पुरुष देखील या गंभीर रोगाला बळी पडू शकतात. तथापि, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग अधिक सामान्य आहे. तसेच, पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊतींचे प्रमाण देखील स्त्रियांच्या तुलनेत खूपच कमी असते, परंतु याचा अर्थ असा नाही की पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकत नाही. आकडेवारी पाहिली तर दरवर्षी एक टक्क्यापेक्षा कमी पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो.

सर्व बाळांचा जन्म स्तनाच्या ऊतीसह होतो ज्यामध्ये दुधाच्या नलिका असतात. कालांतराने ते वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत असले तरी, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. बर्‍याच पुरुषांना हे माहित नसते की स्तनाचा कर्करोग त्यांच्यासाठी एक समस्या असू शकतो. परिणामी, पुरुषांमध्ये स्तनांच्या बदलांविषयी बोलण्याची शक्यता कमी असते. परंतु, जर तुम्हाला स्तनाच्या आजूबाजूला काही असामान्य बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. तुम्हाला स्तनाच्या ऊतीमध्ये गाठ किंवा जाड भाग दिसू शकतो. तसेच लालसरपणा किंवा स्त्राव देखील असू शकतो.

अशा परिस्थितीत आपण त्या कारणांकडे लक्ष दिले पाहिजे, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कारण माहिती असल्यास बचाव होऊ शकतो. आज आपण स्तनाच्या कर्करोगाच्या दरम्यान शरीरात होणारे बदल म्हणजेच त्याशी संबंधित लक्षणे जाणून घेऊ…

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे:

  1. छातीत गाठी : या गाठीमुळे अनेकदा वेदना होत नाहीत, त्यामुळे छातीवर त्याची उपस्थिती कळत नाही. म्हणून, स्तनाभोवतीचे क्षेत्र नियमितपणे तपासणे उचित आहे. स्वतःला स्पर्श करून चाचणी घ्यावी लागते. साधारणपणे पुरुष छातीवर कोणत्याही प्रकारची ढेकूळ असल्याकडे दुर्लक्ष करतात. हे करू नका कारण हे स्तन कर्करोगाचे लक्षण असू शकते. कर्करोग जसजसा वाढतो, तसतसा तो बगलात, लिम्फ नोड्समध्ये आणि कॉलरबोनच्या हाडांच्या आसपास पसरतो.
  2. निप्पलचा आकार बदलणे : स्तनामध्ये गाठ असेल तर त्याच्या वाढीमुळे स्तनामधील अस्थिबंधन ताणणे सुरू होते. अशा स्थितीत स्तनाग्र आतल्या बाजूने बुडू लागतात आणि त्यांचा आकार खराब होतो.
  3. स्तनाग्र स्त्राव : जर तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या शर्टवर कोणत्याही प्रकारचे डाग दिसले तर सावध व्हा. हे चहा किंवा कॉफी देखील असू शकते, परंतु प्रत्येक वेळी ते एकाच बाजूला दिसल्यास ते स्तनाग्र स्त्रावचे लक्षण असू शकते. हे ट्यूमरच्या स्त्रावमुळे होते, जे स्तनाग्रातून बाहेर येते.

निदान :
डॉक्टर तुमच्या लक्षणांवर अवलंबून चाचण्या आणि प्रक्रियेच्या संयोजनावर आधारित निदान करतात. स्तनाच्या तपासणी दरम्यान, डॉक्टर दृष्य बदल शोधतात आणि त्यासाठी त्यांच्या बोटांचा वापर करून गाठ जाणवते का ते बघतात. मॅमोग्राम किंवा अल्ट्रासाऊंड सारखी इमेजिंग चाचणी करून आतील बदल बघतात. बायोप्सी देखील होऊ शकते, या प्रक्रियेत डॉक्टर कर्करोगाच्या पेशी तपासण्यासाठी ऊतक काढण्यासाठी सुई वापरतात.

male breast cancer diagnosis

उपचार :
पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हा सर्वात सामान्य उपचार आहे. यामध्ये सामान्यत: मास्टेक्टॉमीचा (mastectomy) समावेश होतो, जे तुमचे स्तनाचे ऊतक, स्तनाग्र आणि areola आणि आसपासच्या कोणत्याही लिम्फ नोड्स जिथे कर्करोग पसरला आहे, ते काढून टाकते. कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी किंवा केमोथेरपीचा वापर देखील केला जाऊ शकतो.

*लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. आपल्याला काही प्रश्न असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थंडीची चाहूल! हिवाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत