नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने एफडी (FD) दरात सुधारणा केली आहे. आपण देखील एफडी घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 6 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. अॅक्सिस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडीची सुविधा देते. या मुदत ठेवींवर २.50 टक्के ते ५.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
असे असतील आजपासून लागू झालेले नवीन व्याजदर :
- 7 दिवस ते 29 दिवस – 2.50 टक्के
- 30 दिवस ते 3 महिने – 3 टक्के
- 3 महिने ते 4 महिने – 3.5 टक्के
- 4 महिने ते 5 महिने – 3.5 टक्के
- 5 महिने ते 6 महिने – 3.5 टक्के
- 6 महिने ते 7 महिने – 4.40 टक्के
- 7 महिने ते 8 महिने – 4.40 टक्के
- 8 महिने ते 9 महिने – 4.40 टक्के
- 9 महिने ते 10 महिने – 4.40 टक्के
- 10 महिने ते 11 महिने – 4.40 टक्के
- 11 महिने ते 11 महिने 25 दिवस – 4.40 टक्के
- 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष – 4.40 टक्के
- 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवस – 5.10 टक्के
- 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवस – 5.15 टक्के
- 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवस – 5.10 टक्के
- 1 वर्ष 25 दिवस ते 13 महिने – 5.10 टक्के
- 13 महिने ते 14 महिने – 5.10 टक्के
- 14 महिने ते 15 महिने – 5.10 टक्के
- 15 महिने ते 16 महिने – 5.20 टक्के
- 16 महिने ते 17 महिने – 5.20 टक्के
- 17 महिने ते 18 महिने – 5.20 टक्के
- 18 महिने ते 2 वर्षे – 5.25 टक्के
- 2 वर्षे ते 30 महिने – 5.40 टक्के
- 30 महिने ते 3 वर्षे – 5.40 टक्के
- 3 वर्षे ते 5 वर्षे – 5.40 टक्के
- 5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75 टक्के
ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज दर मिळेल?
ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून एफडीवर अधिक व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज दर मिळेल.




