How much salt should be in the diet? Valuable advice from WHO

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात.

आहारात मीठ विविध मार्गांनी समाविष्ट होत असतं. बेकन, चीज, वरुनही मीठ टाकलेले पदार्थ जसे की वेफर्स, इन्स्टंट नूडल्स आणि इतर काही साठवणीचे पदार्थ यामध्ये मीठाचा वापर केला जातो. काही पदार्थ शिजवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. याव्यतिरिक्त विविध प्रकारचे पदार्थांची चव वाढवणारे सॉसही नकळतच रोजच्या जेवणात मीठाचं प्रमाण वाढवतात.

मिठाचं प्रमाण कोणासाठी किती?

  1. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार प्रौढ वयोगटातील व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी (एक टीस्पून पेक्षाही कमी) मीठाचं सेवन केलं पाहिजे.
  2. 15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं. (या वयोगटात 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपान घेणाऱ्या बालकांचा समावेश नाही).
  3. सेवन केलं जाणारं मीठ आयोडिनयुक्त असावं. याची मदत मेंदूच्या वाढीसाठी होते.

दैनंदिन जीवनात मीठाचं प्रमाण कमी कसं करावं?

  1. जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका
  2. मीठाचा जास्त वापर केलेल्या पदार्थांचं सेवन टाळा
  3. सोडियमचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या

जागतिक आरोग्य संघटनेने फक्त घरच्या घरीच नव्हे तर, रेस्टराँ आणि खाद्यपदार्थ उद्योगांनाही मीठाचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबरोबरच आणखी काही उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये नागरिकांना सोडियमच्या अतिसेवनाने उदभवणारा धोका नेमका कसा आहे, हे सांगण्यासोबतच रेस्टराँमध्ये देखील टेबलवरुनही मीठाची बाटली दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत