15-year-old student shot at while returning home from coaching

कोचिंगमधून घरी परतताना 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

क्राईम देश

बिहार : पाटण्यात एका 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी विद्यार्थिनीला पाठीमागून गोळी मारताना दिसून येत आहे. मुलगी समोर येऊन एका गल्लीत वळताच अचानक आरोपीने आपल्या पिशवीतील पिस्तूल बाहेर काढून तिच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी काजल कुमारी नावाची विद्यार्थिनी सिपारा परिसरात कोचिंगमधून घरी परतत होती, यावेळी आधीच तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने मागून तिच्यावर गोळी झाडली. ही गोळी मुलीच्या मानेत घुसली. त्यानंतर काजल घटनास्थळीच कोसळली. मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. मुलगी आपल्या कुटुंबासह बेऊर ठाणे हद्दीतील इंद्रपुरी रोड नंबर 4 मध्ये राहते. तिचे वडील तेज साहू पालेभाज्या विकण्याचा व्यवसाय करतात.

ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 33 सेकंदांच्या या व्हिडिओनुसार ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी घडल्याचे स्पष्ट झाले. काजल इयत्ता 9 वीची विद्यार्थीनी आहे. ती खासगी शिकवणीतून आपल्या घरी पायी जात होती. तिच्या खांद्यावर बॅगही होती. कोचिंगपासून जवळपास 200 मीटर अंतरावरील एका हमरस्त्यावर ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गोळी मारणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. पण अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत