home remedies false myths about coronavirus treatments know what is the truth

कोरोनापासून बचाव करण्यात ‘हे’ घरगुती उपाय अजिबात मदत करत नाहीत, जाणून घ्या अशा ‘टिप्स’मागील सत्य

कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडलेला आहे. अनेक जणांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेकजण निरनिराळे आणि विचित्र घरगुती उपचार घेत असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की यापैकी बरेच उपाय हे कोरोना रोखण्यासाठी किंवा संक्रमित रुग्णाला मदत करण्यात अजिबात कामी येत नाहीत. चला तर अशा काही टिप्स मागील सत्य जाणून घेऊया…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

    1. अँटीबायोटिक्स :
      अफवा : कोरोनापासून बचाव करण्यासाठी अँटीबायोटिक्स प्रभावी आहेत. त्याचबरोबर कोरोना संक्रमित रुग्णाला त्वरित उपचार म्हणून अँटीबायोटिक्स दिली जावीत.
      तथ्य : हार्वर्ड विद्यापीठाच्या मते, अँटीबायोटिक्स जीवाणूजन्य (बॅक्टेरिया) रोगांपासून संरक्षण प्रदान करते. परंतु, कोविड-19 हा विषाणूजन्य आजार आहे. काही कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये असे दिसून आले आहे की त्यांच्या शरीरात काही जीवाणूजन्य रोग देखील आढळतात, फक्त त्यासाठी ही औषधे वापरावी.
    2. दररोज पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे :
      अफवा : दररोज कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने कोरोना संसर्ग टाळता येतो.
      तथ्य : हार्वर्ड विद्यापीठाच्या मते, असा कोणताही पुरावा नाही दररोज कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने कोरोना संसर्ग टाळता येतो.
    3. कापूर -ओव्याचे तेल/ पुरचुंडी :
      अफवा : कोविड रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी कापूर -ओव्याचे तेल यांचे मिश्रण खूप प्रभावी आहे.
      तथ्य : यूएस हेल्थ एजन्सी सीडीसीच्या मते, कापूर स्टीम शरीरात जाऊन विषारी बनू शकते, ती केवळ बाह्य वापरासाठी आहे.
    4. नाकात लिंबाचा रस टाकण्याचा काही फायदा नाही :
      अफवा : अलीकडे असा दावा केला जात आहे की नाकात दोन थेंब लिंबाचा रस टाकल्याने शरीरात ऑक्सिजन संपृक्ततेची पातळी वाढते.
      तथ्य : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु लिंबाचा रस नाकात टाकल्याने शरीरात ऑक्सिजन संपृक्ततेची पातळी वाढत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
    5. नेब्युलायझर्सने ऑक्सिजन मिळत नाही
      अफवा :
      वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे आणि नेब्युलायझर शरीराच्या आत ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करू शकतो.
      तथ्य : तज्ञांनी सांगितले की हे तंत्र अतिरिक्त ऑक्सिजन प्रदान करण्यात अजिबात प्रभावी नाही, उलट चुकीच्या वापरामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत