थायलंड : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. थायलंड ओपन खेळायला गेलेली सायना तिच्या तिसर्या कसोटी अहवालाबद्दल सकारात्मक ठरली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त एचएस प्रणॉय यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यांना वेगळे करण्यास सांगितले गेले आहे. 3rd COVID test here in bangkok ??… The […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं; जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. […]
विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन; बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. “आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही […]
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता […]
झिवाचे अॅडच्या दुनियेत पदार्पण, धोनीबरोबर दिसणार जाहिरात करताना
एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो आयपीएलमध्ये खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडलेला नाही आणि तो बऱ्याच जाहिराती करत आहे. आता धोनीबरोबरच त्याची मुलगी झिवा अॅडच्या दुनियेत पदार्पण करीत आहे. धोनी आणि झिवा हे दोघे एका बिस्किट ब्रँडची जाहिरात करताना दिसणार आहे. या अॅडमध्ये […]
सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्याने छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जिममध्ये […]
रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये असेल भारतीय संघाचा उपकर्णधार
हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये […]
गोड बातमी : भारतीय क्रिकेटपटूच्या घरी मुलीचे आगमन, फोटो शेयर करत दिली माहिती
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर आता एक गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मुलगी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. ट्विट करत त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. […]
IND Vs AUS 2nd Test : भारताचा बॉक्सिंग डे कसोटीत आठ गडी राखून विजय
IND Vs AUS 2nd Test : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजय नोंदवला आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण […]
IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दमदार सुरुवात
IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवशी lunch break पर्यंत ३ बाद ६५ धावा केल्या. सलामीवीर जो […]










