भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत त्याला दमदार उत्तर दिले. रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र अर्धशतक लगावले. […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
IND vs ENG : पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका
IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत […]
दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे निधन
नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे आज (७ फेब्रुवारी) कोलकाता येथे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. भारताचे सध्याचे डेव्हिस चषक प्रशिक्षक झीशान अली यांचे वडील अख्तर यांनी रमेश कृष्णन, विजय अमृतराज, आनंद अमृतराज आणि लिअँडर पेस या खेळाडूंना प्रशिक्षण दिले. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने अखिल अख्तर अली […]
Ind vs eng : जो रुट वेदना सहन न झाल्याने मैदानावर कोसळला आणि विराट मदतीला धावला..
चेन्नई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कर्णधार जो रुट यानं आपल्या १०० व्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शतकी खेळी करत इंग्लंड संघाला अश्वासक सुरुवात करुन दिली आहे. रुटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडनं पहिल्या दिवशी तीन बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यात एक घटना क्रिकेट हा […]
अर्धांगवायूवर मात करत रचला इतिहास : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दोन वेळा जिंकणारी सोनम मलिक पहिली महिला
नवी दिल्ली : हरियाणाच्या 18 वर्षीय सोनम मलिकने 2016 ऑलिम्पिकची पदक विजेती साक्षी मलिकला हरवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National Wrestling Championship) जिंकली. तिने 62 किलो गटात साक्षीला 7-5 ने हरवून सुवर्णपदक जिंकले. साक्षीवर सोनमचा हा सलग तिसरा विजय आहे. तिने 2020 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये साक्षीला पराभूत केले होते. सोनम मलिकबद्दल काही […]
BCCI चा मोठा निर्णय, 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा रद्द
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकचे सामने रद्द करुन बीसीसीआयने त्या बदल्यात पुरुष, महिला गटातील विजय हजारे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी हे नाव […]
सौरव गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी, बसवण्यात आले दोन स्टेंट्स
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली. सौरव गांगुलीच्या हृदयातील धमन्यांमध्ये आणखी दोन स्टेंट्स बसवण्यात आले आहेत. गांगुली यांची 26 दिवसांत दुसऱ्यांदा हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अँजिओप्लास्टीनंतर सौरवची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ देवी शेट्टी […]
हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत दिली मोठी अपडेट
हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी गांगुली यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांना छातीत दुखत असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांच्यावर स्टेटिंग करावे लागणार असल्याचे हॉस्पिटलने सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्यांचे अहवाल […]
सौरव गांगुली यांची प्रकृती व्यवस्थित, चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये
सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून ते थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, असं कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे. सौरव गांगुली त्यांच्या ह्रदयाची स्थिती तपासण्यासाठी आले आहेत. मागच्या वेळी रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स स्थिर आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे.
सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल
बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका […]









