BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्याने छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. पण शनिवारी तो दैनंदिन काम करत होता. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.




