IND vs ENG : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे, त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचे सर्वत्र होतेय कौतुक, गुडघ्याला दुखापत होऊनही…
ओव्हल कसोटीत इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या पॅंटवर गुडघ्याजवळ रक्ताचे डाग दिसत आहेत. चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आश्चर्य व्यक्त केले की रक्तस्त्राव झाल्यानंतरही अँडरसन गोलंदाजी करत राहिला. यावेळी कोहली आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर होते. अँडरसनने कोहलीवर दबाव आणला आणि चेतेश्वर […]
अफगाणिस्तानच्या लोकांना मारणे थांबवा, राशिद खानचे भावनिक आवाहन…
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर तीन स्फोट झाले, ज्यात आतापर्यंत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दुःखी झालेल्या राशिदने एक ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राशिदने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले कि, “काबूलमध्ये पुन्हा रक्त वाहत आहे. कृपया, अफगाणिस्तानच्या लोकांना मारणे थांबवा.” राशिद सध्या आपल्या […]
फुटबॉलर मेस्सीने अश्रू पुसण्यासाठी वापरलेल्या टिश्यूपेपरची किंमत साडेसात कोटी रुपये
दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने तब्बल 21 वर्षांनी बार्सिलोनाला निरोप दिला. मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत होता. मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. मात्र, बार्सिलोना क्लबला निरोप देताना मेस्सीला अश्रू अनावर झाले होते. यावेळी मेस्सीच्या पत्नीने त्याला अश्रू पुसण्यासाठी टिश्यूपेपर दिले होते. आता मेस्सीने अश्रू पुसलेल्या या टिश्यू पेपरची किंमत एक दशलक्ष डॉलर्स […]
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडविरुद्ध मोठा विजय
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 151 रनने जिंकला. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना […]
VIDEO : नीरज चोप्राचा ‘तो’ थ्रो ज्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, व्हिडिओ एकदा पहाच…
टोकियो ऑलिम्पिक : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अभिमानास्पद कामगिरी करून सुवर्णपदक जिंकून दिले. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर नीरज दुसरा भारतीय ठरला. THE THROW THAT WON #IND […]
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, भालाफेकमध्ये रचला इतिहास
टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आज, ऑलिम्पिकच्या 16 व्या दिवशी भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पूर्ण झाल्या. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. नीरज चोप्राने इतिहास रचला भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक […]
ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले […]
कुस्तीपटू रवी दहियाने ऑलिम्पिकमध्ये मिळवले रौप्यपदक, कठोर परिश्रम आणि अनेक वर्षांचा संघर्ष आणि कष्टाचे चीज
Tokyo Olympics : देशाचा आघाडीचा कुस्तीपटू रवी दहिया ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. कठोर परिश्रम, अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यागाच्या जोरावर त्याला क्रीडा क्षेत्रात ही मोठी कामगिरी करता आली. परंतु, रवीसाठी हा प्रवास खूपच अवघड होता. रवी दहियाचे वडिल स्वत: दररोज छत्रसाल स्टेडियमवर दूध आणि लोणी घेऊन जात असत. यासाठी ते रोज […]
कझाकिस्तानचा खेळाडू कुस्तीपटू रवी दहियाच्या हाताला कडाडून चावला, तरीही रवीने पकड ढिली पडू दिली नाही
टोकियो ऑलिम्पिक : कुस्तीपटू रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित केले आहे. त्याने बुधवारी 57 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला, पण सामना संपल्यानंतर या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. कझाक कुस्तीपटू नुरिस्लाम याने सामन्यादरम्यान कुस्तीपटू रवीच्या हातामध्ये दात घुसवले आणि तो रवीला चावताना दिसत […]










