दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने तब्बल 21 वर्षांनी बार्सिलोनाला निरोप दिला. मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत होता. मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. मात्र, बार्सिलोना क्लबला निरोप देताना मेस्सीला अश्रू अनावर झाले होते. यावेळी मेस्सीच्या पत्नीने त्याला अश्रू पुसण्यासाठी टिश्यूपेपर दिले होते. आता मेस्सीने अश्रू पुसलेल्या या टिश्यू पेपरची किंमत एक दशलक्ष डॉलर्स म्हणजेच साडेसात कोटी रुपये झाली आहे.
मेस्सीला निरोप देताना एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मेस्सी भावूक झाला आणि मेस्सीला अश्रू अनावर झाले होते. मेस्सीच्या पत्नीने त्याला टिश्यू पेपर दिले. त्याने मेस्सीने आपले डोळे पुसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर एका व्यक्तीने ते टिश्यू पेपर गोळा केले आणि या टिश्यू पेपरची ऑनलाईन जाहीरात पोस्ट केली. मर्काडो लिब्रे या वेबसाईटवर मेस्सीने अश्रू पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू चाहत्यांना एक दशलक्ष डॉलर्स (सुमारे साडेसात कोटी रुपयांमध्ये मिळू शकतो.




