IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नईशी होईल. कोलकाता संघ दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 28 सप्टेंबर रोजी दिल्लीशी झालेल्या लढतीत कोलकाताने तीन गडी […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय
शारजाह : आयपीएलच्या कालच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाताविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे विराट कोहली चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विराट म्हणाला की, “आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाली होती. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी […]
ऋतुराज गायकवाडची धमाकेदार कामगिरी, ऑरेंज कॅप त्यालाच मिळणार याची चाहत्यांना खात्री
IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले तीन तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडू आहेत. यंदा चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर सर्वांचे लक्ष होते, त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत धमाकेदार कामगिरी केली आहे. ऋतुराज सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. […]
IPL 2021 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मैच
IPL 2021 फेज -2 मधील पहिला क्वालिफायर आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पहिले दोन स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या दोन संघांमधील सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची […]
खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार
पुणे : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो […]
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना, दोघांसमोर ‘करो वा मरो’ परिस्थिती
IPL 2021 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यांत 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे. या हंगामात मुंबई आणि राजस्थान यांच्यातील पहिला सामना 29 एप्रिल रोजी खेळला गेला. मुंबईने तो सामना 7 गडी राखून […]
आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना
IPL 2021 : आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून शारजाहमध्ये हा सामना खेळवला जाईल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 10 सामन्यांत 16 गुणांसह प्ले-ऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाला 10 सामन्यात फक्त 4 गुण मिळवता आले आहेत. हैदराबादकडे अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता […]
न्यूझीलंड क्रिकेट संघाने रद्द केला पाकिस्तान दौरा, सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला निर्णय
रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी हा निर्णय घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त सूचना (intelligence alert) मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानमधून […]
मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने दिली ‘त्या’ भुखंडाला मान्यता
मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना म्हाडाने पत्र पाठवून सुनील गावसकर फाऊंडेशनसाठीच्या भुखंडाबाबत मोठी बातमी दिली आहे. सुनील गावसकर फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारकडे वांद्रे-कुर्ला संकुल येथे इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी भुखंड मागितला होता. महाराष्ट्र सरकारने आज या दोन हजार चौरस मीटर भुखंडाला मान्यता दिली आहे. सुनील गावसकर फाऊंडेशनला या केंद्रातून होणाऱ्या नफ्यातील २५ टक्के […]
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट, लिहिली भावनिक पोस्ट
नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने घटस्फोट घेतल्याची माहिती मिळाली आहे. शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. दोनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर काय वाटतं, याबाबत तिने लिहिलं आहे. आयशाने शिखरसोबतचे आपले फोटोही डिलीट केले आहेत. शिखर आणि आयशा यांनी 2012 साली लग्न केलं होतं. आयशाने त्याअगोदरही पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट […]










