IPL 2021: Match between Delhi and Kolkata in the second qualifier today

IPL 2021 : आज दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली आणि कोलकाता यांच्यात मॅच

क्रीडा

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नईशी होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोलकाता संघ दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 28 सप्टेंबर रोजी दिल्लीशी झालेल्या लढतीत कोलकाताने तीन गडी राखून विजय मिळवला होता.

दिल्लीच्या संघाने या हंगामात एकूणच चांगली कामगिरी केली आहे आणि साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी गमावली आहे. क्वालिफायर 1 मध्ये दिल्लीच्या संघाचा चेन्नई सुपर किंग्जने 4 विकेटने पराभव केला. त्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात हॅटट्रिक चौकार मारून रोमहर्षक विजय मिळवला. अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत