दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्धनौकेवर तैनात होणार दोन महिला अधिकारी
भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह या दोघीही आयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलेट म्हणून ऑन बोर्ड काम करतील. युद्धनौकेवर तैनात होणाऱ्या भारतीय नौसेनेच्या या पहिल्या महिला अधिकारी ठरतील. यापूर्वी केवळ समुद्रकिनाऱ्यांवरुन उडून पुन्हा परतणाऱ्या हेलिकॉप्टरच्या […]
NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई
NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे […]
गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं; या कारणाने हटवलं होतं
मुंबई : Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम App हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना […]
खासदारांच्या वेतनामध्ये होणार ३० टक्के कपात, विधेयक राज्यसभेत मंजूर
लोकसभेत खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासदाराला दरवर्षी देण्यात येणारा ५ कोटींचा खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर […]
पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई
ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अॅपवरही कारवाई […]
मोदी सरकारसाठी मोठा धक्का; शेतकरीविरोधी अध्यादेश निषेधार्थ केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा
दिल्ली : अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे. संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. I have resigned from Union Cabinet in […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS डिस्चार्ज
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज (गुरुवार) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अमित शहा हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गडकरी यांचं ट्विट: “काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण […]
भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि OIC ला भारताने सुनावलं
मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ला भारताने मंगळवारी जोरदार फटकारले. तुर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला तेव्हा भारताने टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये भाष्य न करण्याचा सल्ला दिला आणि लोकशाही प्रक्रियेची अधिक चांगली समज विकसित केली पाहिजे असे सांगितले. “भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या […]









