दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
रेल्वे राज्यमंत्र्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला. ‘सुरेश अंगडी हे एक असामान्य कार्यकर्ता होते. कर्नाटकमध्ये भाजपला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांची मोठी सक्रीय भूमिका होती. पक्षाला मोठे करण्यासाठी कष्ट करणारे अंगडी जनसेवेसाठी समर्पित खासदार आणि प्रभावी मंत्री होते. आपल्या कामाच्या झंझावातासाठी त्यांचे राजकीय वर्तुळात नेहमीच कौतुक झाले. त्यांचे निधन ही एक दुःखद घटना आहे. मी शोक प्रकट करतो. या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या सोबत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’; अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.
Shri Suresh Angadi was an exceptional Karyakarta, who worked hard to make the Party strong in Karnataka. He was a dedicated MP and effective Minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti. pic.twitter.com/2QDHQe0Pmj
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक प्रकट केला आणि त्यांनी देशासाठी तसेच पक्षासाठी केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितल्या.
Deeply pained to learn about the passing away of MoS Railways and senior BJP leader from Karnataka, Shri Suresh Angadi ji. He will always be remembered for his selfless service to the nation and party. My deepest condolences are with his family. Om Shanti Shanti Shanti
— Amit Shah (@AmitShah) September 23, 2020




