महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद, या मुद्द्यांवर केलं भाष्य….

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर  जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, राज्यात या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे. देवेंद्र […]

mla kisan kathore car accident
महाराष्ट्र

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून आमदार किसन कथोरे यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने चालले असता वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर… देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही […]

11th grade student commits suicide due to harassment
महाराष्ट्र

धक्कादायक : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने  गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या […]

TRP scam: Republic TV CEO Vikas Khanchandani arrested
मुंबई

टीआरपी घोटाळा : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. […]

Pankaja Munde donated blood on the occasion of Gopinath Munde's birthday
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथगडावर केलं रक्तदान

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडिया माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलं. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी […]

Sharad Pawar
महाराष्ट्र

शरद पवार पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले विरोधी पक्षातले एकमेव नेते – शिवसेना

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त खास अग्रलेख लिहून शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाशी करण्यात आली आहे. ‘यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. ‘महाराष्ट्रातील काँगेस पक्षात मागच्या ७० वर्षांत खूप मोठे नेते निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता […]

election
महाराष्ट्र

१५ जानेवारी रोजी १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. मदान यांनी सांगितले कि, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 […]

Excellent tourism facilities should be created in Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray
कोल्हापूर महाराष्ट्र

दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण कराव्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळवून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दाजीपूर […]

Sharad Pawar's name for UPA presidency is a plan to end Congress - Sanjay Nirupam
महाराष्ट्र राजकारण

हा तर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग – संजय निरुपम

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे. […]