गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडिया माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलं.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलं. तसेच गोपीनाथगडावर पंकजा मुंडेंनी स्वतः देखील रक्तदान केलं. त्यांच्यासमवेत महादेव जानकर यांनीही रक्तदान केलं.