मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला ड्रग्स प्रकरणात अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
ब्रेकिंग : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या आरोपांवर दिलं स्पष्टीकरण
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यावर आता मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ‘आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका […]
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या पत्नीने गंभीर आरोप लावत केली तक्रार
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे मुंडे यांच्यापुढे पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा थेट आरोप मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास आमरण उपोषण करणार […]
शरजील उस्मानीवर होणार कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
मुंबई : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर असून आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य करत चिथावणीखोर भाषा वापरली होती. तो म्हणाला होता की, “आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या […]
ब्रेकिंग : १५ फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालयं होणार सुरू
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होणार आहेत, येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही, याबाबत G. R. काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत […]
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मिळणार
मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना […]
ब्रेकिंग : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय
मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या […]
मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून प्यायले सॅनिटायझर
मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून वेळीच प्रकार लक्षात आला. मुंबई महापालिकेत आज बजेट सादर होत आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहआयुक्त […]
पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तब्बल चार महिन्यांनी सापडला सांगाडा, मानेच्या हाडात अडकलेला होता शर्ट..
सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. आता तब्बल चार महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. अजय चौधरी […]
एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात FIR दाखल
पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात पुणे पोलिसांनी FIR दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला […]










