sushant singh rajput
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांतला ड्रग्सची सवय कशी लागली? ऋषिकेश पवारच्या अटके नंतर एनसीबीचा खुलासा..

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला ड्रग्स प्रकरणात अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून टाकलं होतं. ऋषिकेश पवारच सुशांतला गांजाचा सप्लाय करत होता आणि त्याला गांजाची सवय लावण्यातही ऋषिकेश पवारचाच मोठा हात होता.

लॉकडाऊन दरम्यान, सुशांतला गांजा घेण्यासाठी ऋषिकेश पवारचीच मदत घ्यावी लागली होती. सुशांतच्या सांगण्यावरुन त्याचा नोकर दीपेश सावंत, ऋषिकेश पवारशी संपर्क साधत होता आणि त्यानंतर पवार दीपेशला गांजा आणून देत होता. ऋषिकेश पवारला एनसीबीने बुधवारी किला कोर्टात सादर केलं होतं. त्यानंतर त्याला 2 दिवस एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आलं होतं. एनसीबी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक तपासासाठी एनसीबीने ऋषिकेश पवारचा लॅपटॉप जप्त केला होता. या लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात एनसीबीला अनेक पुरावे मिळाले असून ड्रग्ज संबंधित अनेक फोटोही मिळाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत